या मंदिराची स्थापना श्री दत्तात्रय यांनी केली आहे असा समज आहे.
सूर्यपुत्र श्री शनी देवास जेव्हा आपल्या पत्नीने शाप दिला होता तेव्हा त्याने याच ठिकाणी गणेशाची आराधना केल्याचे समजले जाते.
याच मंदिरामध्ये ज्येष्ठ शुध्द चतुर्थीला जन्मोत्सव साजरा केला जातो
.हे मंदिर गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर गावाच्या एका टोकाला आहे.
याच नदीच्या उत्तर तीरावर दत्ताचे आणि विज्ञान शंकराचे मंदिर आहे.
या गणेश मंदिराजवळ शनी, गुरु, बुध, बृहस्पती, यांचे मंदिर आहे.
येथे पेशव्यांनी निजामाला आपल्या पराक्रमाने वचक बसवला होता.