नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री महागणपती वाई सातारा

पेशव्यांचे सरदार गोखले यांनी १७६२ मध्ये वाईत कृष्णेच्या पाताळात पूर्वाभिमुख असे हे श्रीमहागणपतीचे मंदिर बांधले होते.

या मंदिराला भरपूर कमानी आणि दारं आहेत मूर्तीचा आकार अजस्त्र असल्याने याला ढोल्या गणपती असेही नाव आहे.

सात फूट उंच आणि सहा फूट रूंद अशी ही मूर्ती आहे. शिवाय प्रभावळ बारा फूट उंच आणि ढोलासारखा मोठे पोर्ट अशी आहे

त्यामुळे ही मूर्ती महाकाय वाटते. १६९१ साली वैशाख शुद्ध त्रयोदशीला येथे देवाची स्थापना झाली

तो दिवस थाटामाटात उत्सव स्वरूपात साजरा केला जातो भाद्रपदात सात दिवस येथे उत्सव असतो.

पुणे बेंगलोर रस्त्यावर साताऱ्याच्या आधी  पांचवड असे गाव लागते तेथून वाई महाबळेश्वर पोलादपूर असा फाटा आहे.

सातार्‍यापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर वाई हे गाव आहे. येथे मंदिराची स्थापना केली.