नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


चिंचबागेतला गणपती हरिपूर रस्ता सांगली

सांगली जिल्ह्यातला चिंचबागेतला हा गणपती दोन ते अडीच फूट उंचीचा आहे.

या मंदिरात माघी गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

मोठ्या प्रमाणात खिरीचा नैवेद्य ही बनवला जातो. हरिपूरला कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम आहे.

प्रभू श्रीराम सुवर्णमयूर मारीच याच्या वधानंतर पापक्षालनासाठी याठिकाणी आले होते आणि तिथे त्यांनी संगमेश्वर शिवाची स्थापना केली होती.

हरिपूरच्या या मंदिरामध्ये वरदविनायकाचे स्थापना केली गेली आहे. वृध्द भक्तांच्या आग्रह आग्रहावरून गणेश इथे पळत आले आणि कृष्णाकाठी स्थिर झाले

अशी आख्यायिकाही आहे पुढे जेथे मंदिर बनवले गेले. हाच तो चीनचा भाग घेतला गणपती गणपतीचे मंदिर बेताचेच असून परिसर रमणीय आहे.

सांगलीचे संस्थानिक पटवर्धन येथे दर्शनाला यायचे. सांगलीहून हरिपूरला येण्यासाठी बस,पायी,टांगा असे अनेक पर्याय आहेत.