थेऊरचे श्री चिंतामणीचे हे गणेशस्थान अष्टविनायकांपैकी एक आहे.
पुणे स्वारगेट पासून एकवीस किलोमीटर अंतरावर असुन येथे जाण्यासाठी पीएमटी बसेस उपलब्ध आहेत.
चिंतामणी समोर माधवराव पेशव्यांनी आपला देह सोडला होता. श्रीमंत पत्नी येथे सती गेल्या होत्या.
मुळा नदीच्या काठावर चिंतामणी समोर सतीचे वृंदावन आहे.
उत्तराभिमुख असलेले हे मंदिर साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे.
हे मंदिर चिंचवडच्या चिंतामणी महाराजांनी बांधले आहे त्यानंतर पेशवे मंडळींनी मंदिराचे अन्य भाग बांधले.
ब्रह्मदेवाने येथे घोर तपस्या केली असे सांगतात. पश्चात्तापदग्ध इंद्रानं गौतमऋषींच्या सल्ल्यावरून येथे श्रीगणेशाच्या षडाक्षरी मंत्राची तपसाधना केल हाेती