नवसाला पावणारे गणपती- भाग ३

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री त्रिशुंड गणपती सोमवार पेठ पुणे

या त्रिशुंड गणपती मंदिराची घडण शिव मंदिराप्रमाणेच आहे. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे.

तीन सोंड्या गणपती हा तंत्र, मंत्र साधनेशी संबंधित आहे.

या मूर्तीवर अभिषेक केला की तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.

२६ ऑगस्ट १७५४ ला भीमगीरजी गोसावी(इंदूर) या महंताने हे मंदिर बांधले.

सोमवार पेठेतील नागझरी पुलाजवळ इमारतीच्या पायाचे खोदकाम करताना या पाठशाळेच्या शोध लागला. मंदिराची मांडणी करताना वर मंदिर आणि खाली तळघर समाधी व हठयोग्यांची पाठशाळा असे होते.

गर्भगृहातील गणेशमूर्तीच्या मागे कोनाड्यात साडेतीन फुटाची उंचीची शेषशक्ती भगवानाची मूर्ती आहे.