नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री वणीचा गणपती, सप्तशृंगगड, नांदुरी, नाशिक

हे गणेशमंदिर वणीच्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या स्थानकाजवळील गणेश कुंडालगत आहे.

या या गणपती मंदिरातील मूर्ती अखंड पाषाणात खोदलेली आणि पूर्वाभिमुख आहे.

सप्तशृंगी देवी ही वाणी समाजाची कुलस्वामिनी म्हणूनही पुजली जाते.

गणपतीचे हे मंदिर पापड पाडा या आदिवासी गावाच्या जंगलात डोंगरकपारीत आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी गडावर चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या होत्या.

पूर्वी हाच मार्ग देवीच्या गडावर जाण्यासाठी वापरला जायचा.

नाशिक शहरातून वाणीला जाण्यासाठी भरपूर बसेस उपलब्ध आहेत.

शिवाय बसने दीड तास लागतो.