नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


द्वादशहस्त गणपती औरंगाबाद शहर

द्वादश हस्त गणेश हे खाजगी स्वरुपातील शहराबाहेरील खंडोबा येथील दांडेकर वाड्यातील गणपती स्थान आहे.

ही मूर्ती अतिशय दुर्मिळ आहे थोरले बाजीराव पेशव्यांनी बारा हातांची अशी पंचधातूंची मूर्ती अनुष्ठान याकरिता बनवून घेतली होती.

त्यांनी एक कोटी दुर्वा वाहण्याचा संकल्पही सोडला होता. हा संकल्प काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत,

पुढे त्यांनी आपले गुरू नारायण महाराज पाटणकर दीक्षित यांच्याकडे पुढील संकल्प सोपवला व तो  तडीस नेला होता

मुंबईत औरंगाबाद रेल्वेचे अंतर ३७४ किलोमीटर इतके आहे आणि औरंगाबाद बस स्थानकावरून एस.टीने वीस मिनिटांत द्वादशहस्त गणेश स्थानास जाता येते.