नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री महागणपती फडकेवाडी गिरगाव

मुंबईतील गिरगाव येथे भरवस्तीत एक पुरातन गणेश मंदिर आहे.

रायगड जिल्ह्यातील आवास येथील गोविंद गंगाधर फडके हे नोकरीसाठी मुंबईत एकोणीस पासष्ठ साली आले होते

त्यांना अपत्य नव्हते. सध्याच्या गणेश मंदिर परिसरातील जागा त्यांनी विकत घेतली व गजाननास पुत्र मानून येथे गणेश मंदिर बांधले.

पुरातन बांधणीचे दगडी व लाकडी मंदिर हे आहे हे मंदिर आहे.

या मंदिरात यवतमाळचे पुंड शास्त्री यांनी बरीच वर्षे प्रवचने केली हाेती.