नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


बालदिगंबर गणेश कडाव कर्जत

गणेशभक्त कण्वमुनींनी बालदिगंबर हे गणेशस्थान स्थापित केले आहे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी शेत नांगरताना या या मंदिरातील गणेशमूर्ती धुळे यांच्या शेतात सापडली होती.

त्या दिवसापासून बालदिगंबर गणेश हे धुळ्याचे कुलदैवत आहे या घराण्यात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मृत्तिकेचे गणेशमूर्ती आणीत नाहीत.

त्यांच्या घरात असलेल्या गणपतीची पूजा केली जाते. हे स्थान १००० वर्षांपूर्वीचे असावे

माधवराव पेशव्यांनी देवस्थानाला जागा इनाम दिली हाेती व त्याचा जीर्णोद्धार केला होता.

गणेश मूर्ती मोठी आहे, परंतु हा बालदिगंबर गणेश भक्तांच्या नवसाला पावतो अशी त्यांच्यात श्रद्धा आहे.

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जत रेल्वे स्थानकापासून बसने साधारण पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर हे गणेशस्थान आहे.

पुढे आठ किलोमीटर वैजनाथ हे ही शंकराचे अति रमणीय ठिकाण आहे.