नवसाला पावणारे गणपती- भाग ४

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री वक्रतुंड आवास अलिबाग रायगड

अलिबागहून आवाससाठी एक फाटा आहे पुढे तीन किलोमीटरवर गणेश मंदिर आहे.

स्कंद पुराणातील संदर्भानुसार अभिजीत नावाचा निःसंतान राजाने कनकेश्वराच्या शंकराच्या उपासनेनंतर वक्रतुंड प्रसन्न झाले होते .

त्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. वक्रतुंड गणेशाचा वास आवास येथे झाला.  

या मंदिरातील मूर्ती पूर्व पश्चिम आहे. हे स्टेप पिरॅमिड पद्धतीची घुमटी असलेले कौलारू मंदिर आहे.

या मंदिराच्या बाजूला अतिप्राचीन शिवपिंडी आहेत