सिद्धिविनायकाचे हे मंदिर प्राचीन गणेश मंदिर आहे व जागृत स्थान आहे
हे मंदिर काळ्या पाषाणातील असून अत्यंत प्राचीन व आकारबंद आहे.
पेशव्यांच्या काळापासून या मंदिराचा उल्लेख आहे
शिवाय गणेशभक्तांची चिमाजी अप्पा यांच्याकडे देवस्थानांची व्यवस्था होती.
पुढे चिमाजी अप्पांची मुलगी बावळे यांच्या घरी ती चालत आली.
लोकमान्य टिळकांच्या गुरूस्थानी असलेल्या अप्पासाहेब पटवर्धनांच्या मातोश्रींनी गणेशाची उपासना केल्यानंतर, त्यांच्या मागणीनुसार हे गणेशाचे पूजन त्यांच्याकडे आले.
या गणेशाची मूर्ती चतुर्भुज उजव्या सोंडेची आहे.