अक्षदाचा गणपती म्हणजे कृष्णाकाठच्या ब्राह्मण आळीतील पुरातन काळापासून असलेले जागृत देवस्थान आहे.
याला धुंडिविनायक ही म्हणतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे आहे. हे मंदिर सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे असावे.
प्रदक्षिणेच्या मार्गाभोवती सहा तुळशीचे वृंदावन आहेत आणि ती सिध्दपुरूषांने समाधि स्थानं मानली जातात.
याच मंदिराच्या डावीकडे गाणपत्य ढवळीकरांनी संजीवनी समाधी आहे. धुंडिविनायक ही गणेशमूर्ती तीन फूट उंच व रुंद आहे.
वाई येथील साबणे घराण्याकडे देवस्थानांची व्यवस्था आहे. पेशव्यांकडून देवस्थानास वर्षासन चालू झाले हाेते.
पुणे बेंगलोर महामार्गावर सातारा हे शहर आहे
या शहरापासून महाबळेश्वर रस्त्यावर जाताना तासाभरात वाई येते आणि तिथेच हा अक्षदीचा गणपती आहे.