नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


गणेशवाडीचा गणपती गणेशवाडी वडूज खटाव

गणेशवाडी  वडूज येथे वाहणार्‍या थेरोळा नदीच्या पात्रात दोन्ही गणेशमूर्ती वाहत अाली

एका गणेशभक्ताने ती आपल्या घरी आणली ही मूर्ती दीड फूट रुंद उदार पावणेदोन फूट उंचीची व वजनाने सुमारे तीन किलोची आहे

श्रावणी अमावस्येच्या आदल्या दिवशी या मूर्तीचा जन्मोत्सव होतो. या गणपतीच्या गणेशोत्सव माग किंवा भाद्रपद महिन्यात होत नाही.

औंध संस्थान खालसा झाल्यानंतर इनाम मध्ये हे देवस्थान मिळालेले होते

सातारा पंढरपूर रस्त्यावर वडूज हे गाव आहे तिथून दीड किलोमीटरच्या अंतरावर हे गणेशस्थान आहे.