नवसाला पावणारे गणपती- भाग ५

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


वरद गुपचूप गणपती पुणे

श्रीरामचंद्र विष्णु गुपचूप यांनी माघ शुद्ध त्रयोदशीला शके १८१३ मध्ये श्री वरद गणपती नावाने या गणेश मंदिराची स्थापना केली.

गणेशभक्त आणि मूर्तिकार म्हणून गुपचूप प्रसिध्द होते. पण पुढे निर्वंश झाल्याने तेथील पुजारी असलेल्या दीक्षित शास्त्रींकडे मंदिराची व्यवस्था देण्यात आली.

औंध संस्थानातील लाकडे तोडून आणून त्यांनी मंदिर उभारले हाेते.

पानशेतच्या पुराने मंदिराची खूपच हानी झाली. लोकमान्य टिळकांना या देवस्थानाची प्रचीती आली होती.

 येथे कीर्तनास उभे राहता येत नाही. येथे गुळाचा खडा ठेवून नवस बोलला जातो

. येथील मूर्ती पावणेतीन फूट उंच व अडीच फूट रुंद शिवाय डाव्या सोंडेची आहे.