जैन श्रमणांचा मांसाहार
इतर श्रमणसंप्रदायात जे अत्यंत तपस्वी होते त्यात प्रामुख्याने जैनांची गणना होत असे. असे असता जैनसंप्रदायतील श्रमण मांसाहार करीत होते, असे आचारांग सूत्रातील खालील उतार्यावरून दिसून येईल—
“से भिक्खू वा बिक्खुणी वा सेज्जं पुण जाणेज्जां बहुअट्ठिं मंवा, मच्छं व बहुकंटं अस्मि खलू पडिगाहितंसि अप्पे सिया भोयणजाए बहुउज्झियधम्मिए। तबप्पगारं बहुअट्ठिंयं मंसं, मच्छं वा बहुकंटकं, भेवि संते णो पडिगाहेज्जा। से भिक्खु वा भिक्खुणी वा गाहावइकुलं पिंडवायपडयाए अणुपविट्ठे समाणे परी बहुअट्ठिएण मसेण मच्छेण उवणिमतेज्जा, आउसंतो समणा अबिकंखसि बहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्तए? एयप्पगारं णिग्घोसं सोच्चा णिसम्म से पृथ्वमेव आलोएज्जा, आउसोत्ति व भइणीति वा णो खल मे कप्पइ बहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्ते, अभिकंखसि से दाऊं जाबइयं तावइयं पोग्गल दलयाहि म अट्ठियाइं। से सेवं बदंतस्स परो अभिहट्ठ अंतोपडिगाहगंस बहुअट्ठियं मंसं परिभाएत्ता णिहट्ठा दलएज्जा, तहप्पगारं पडिग्गहणं परहत्थंसि वा परपायसि ला अफासुयं अणेसणिज्ज लाभे वि संते णो पडिगाहेज्जा। से आहच्च पडिगाहिए सिया त णोहित्ति वएज्जा, अणोवत्ति वएज्जा। से त्तपायाय एगंतमवक्कमेज्जा। अवक्कमेत्ता अहेआरामंसि व अहेउवस्सयंसि अप्पंडए जाब संताणए मसंग मच्छगं भोच्चा अटिठ्याइंकटए गहाय से त्तमायाए एगंतमवक्कमेज्जा। अवक्कमेत्ता अबेज्झामथडिलस वा अट्ठिरासिसि व किट्ठरासिसि वा तुमरसिसि वा गोमयरसिसि वा अम्णयरसि वा तहप्पगारसि लस पडिलेहिय पडिलेहिय पमज्जय पमज्जिय तओ संजयामेव पमज्जिय पमज्जिय परि वेज्जा।“
‘पुनरपि तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी फार हाडे असलेले मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर जाणील की, यात खाण्याचा पदार्थ कमी व टाकण्याचा जास्त आहे. अशा प्रकारचे पुष्कळ हाडे असलेले मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर तो त्याने घेऊ नये. तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी गृहस्थाच्या घरी भिक्षेसाठी गेला किंवा गेली असता गृहस्थ म्हणेल, आयुष्मान श्रमणा, हे पुष्कळ हाडे असलेले मांस घेण्याची तुझी इच्छा आहे काय? अशा प्रकारचे भाषण ऐकून पूर्वीच त्याने म्हणावे, आयुष्मान किंवा (बाई असेल तर) भगिनी हे फार हाडे असलेले मांस घेणे मला योग्य नाही. जर तुझी इच्छा असेल तर फक्त मांस तेवढे दे. हाडे देऊ नकोस. असे म्हणत असताही जर तो गृहस्थ आग्रहाने देण्यास प्रवृत्त झाला तर ते अयोग्य समजून घेऊ नये. त्याने ते पात्रात टाकले, तर ते एका बाजूला घेऊन जावे आणि आरामात किंवा उपाश्रयात प्राण्यांची अंडी तुरळक असतील अशा ठिकाणी बसून मांस आणि मासा तेवढा खाऊन हाडे व काटे घेऊन एका बाजूला जावे. तेथे जाऊन भाजलेल्या जमिनीवर, हाडांच्या राशीवर, गंजलेल्या लोखंडाच्या जुन्या तुकडय़ांच्या राशीवर, तुसाच्या राशीवर, वाळलेल्या शेणाच्या राशीवर किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या स्थंडिलावर (उंचवटय़ावर) जागा चांगल्या रीतीने साफसूफ करून ती हाडे किंवा ते काटे संयमपूर्वक त्या ठिकाणी ठेवून द्यावे.’
याचाच अनुवाद दशवैशालिक सूत्रातील खालील गाथांत संक्षेपाने केला आहे-
बहु अट्ठियं पुग्गलं अरिमिसं वा बहुकंटयं ।
अच्छियं तिंदुयं बिल्लं, उच्छुखण्डं व सिंबलिं ।।
अप्पे सिआ भो अणज्जाए, बहुउज्झिय धम्मियं ।
दिंतिं पडिआइक्खे न मे कप्पई तारिंसं ।।
‘पुष्कळ हाडे असलेले मास, पुष्कळ काटे असलेला मासा, अस्थिवृक्षाचे फळ, बेलफळ, ऊस, शाल्मलि अशा प्रकारचे पदार्थ- ज्यात खाण्याचा भाग कमी व टाकण्याचा जास्त- देणारीला, ते मला योग्य नाहीत, असे म्हणून प्रतिबंध करावा.’