अशोककालीं बौध्दसंघांत जातिभेद नव्हता
अशोकसमकालीन बौध्द संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता, असें दिव्यावदानांतील यश अमात्याच्या गोष्टीवरून दिसून येतें.
अशोक राजा नुकताच बौध्द झाला होता व तो सर्व भिक्षूंच्या पायां पडे. तें पाहून यश नावांचा त्याचा अमात्य म्हणाला,''महाराज, या शाक्य श्रमणांत सर्व जातीचे लोक आहेत, त्यांपुढे आपलें अभिषिक्त डोकें नमवणें योग्य नव्हे.''
अशोकाने कांही उत्तर दिलें नाही आणि कांही काळाने बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांची डोकीं मागवून तीं विकावयास लावलीं; यशाला मनुष्याचें डोकें आणावयास लावून तें विकावयास लावलें. बकरे मेंढे वगैरे प्राण्यांच्या डोक्यांची कांही किंमत आली; पण माणसाचें डोकें कोणी घेईना. तेव्हा अशोकाने तें कोणाला तरी फुकट द्यावें असें फर्मावलें. परंतु तें फुकट घेणारा मनुष्य यश अमात्याला आढळला नाही. ही गोष्ट त्याने अशोकाला निवेदिली. तेव्हा अशोक म्हणाला,''हें मनुष्याचें डोकें फुकट दिलें तरी लोक कां घेत नाहीत?''
यश- कारण ते ह्या डोक्याचा कंटाळा करतात.
अ.- याच माणसाच्या डोक्याचा ते कंटाळा करतात, की सर्वच माणसांच्या डोक्याचा ते कंटाळा करतील.
अ. - माझ्या डोक्याचा देखील कंटाळा करतील काय?
या प्रश्नाचें उत्तर देण्यास यश धजेना. पण अशोकाने अभयदान दिल्यावर तो म्हणाला,'' महाराज आपल्या डोक्यालांही लोक असेच कंटाळतील.''
अ.- तर मग मीं असें डोकें भिक्षूंच्या पायावर ठेवून त्यांचा बहुमान केला, तर तुला वाईट का वाटावें?
या संवादानंतर कांही श्लोक आहेत त्यांपैकी हा एक -
आवाहकालेऽथ विवाहकाले
जाते: परीक्षा न तु धर्मकाले।
धर्मक्रियाया हि गुणा निमित्ता
गुणाश्च जातिं न विचारयन्ति॥
'मुलाच्या आणि मुलीच्या लग्नांत* जातीचा विचार करणें योग्य आहे. धार्मिक बाबतीत जातीचा विचार करण्याचे कारण नाही. कां की, धार्मिक कृत्यांत गुण पाहावे लागतात; आणि गुण जातीवर अवलंबून नसतात.'
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* आवाह म्हणजे सुनेला घरीं आणणें आणि विवाह म्हणजे आपल्या मुलीचें लग्न करून सासरी पाठविणें.