बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग १ ला 22

प्रव्राजनीय कर्म (हांकून लावणें)

७४. त्या काळीं अस्सजि (अश्वजित्) व पुनब्बसुक (पुनर्वसुक) हे दोघे भिक्षु कीटागिरी येथें रहात होते. ते आरामांत फुलझाडें लावून त्यांच्या माला वगैरे करून स्त्रियांना किंवा कुमारींना देत असत. आपण नृत्य करीत, गात व वाजवीत असत; व इतरांना नाचावयास, गावयास व वाजवावयास लावीत; नाना तर्‍हेचे खेळ खेळत असत; व दुसरेहि पुष्कळ असभ्य प्रकार करीत. एक भिक्षु वर्षाकाळानंतर काशी देशांतून श्रावस्तीला येत असतां कीटागिरि येथें येऊन गांवांत भिक्षेला गेला. त्याची शांत चर्या पाहून तेथील लोक म्हणाले, “हा असला बावळट, मंद, दांभिक कुठला भिक्षु? असल्या भिक्षुला भिक्षा कोण देतो? आमचे अस्सजि आणि पुनब्बसुक कसे सुस्वभावी, सरळ, मोकळ्या मनानें चालणारे व बोलणारे,- त्यांनाच भिक्षा देणें योग्य होय.” त्या गांवांत एक उपासक असे. त्यानें ह्या नवीन आलेल्या भिक्षूला, कांहीं भिक्षा मिळाली कीं काय असा प्रश्न केला, व त्याला भिक्षा मुळींच मिळाली नाहीं असें समजल्यावर आपल्या घरीं नेऊन जेऊं घातलें. तो भिक्षु श्रावस्तीस जात आहे हें वर्तमान ऐकून तो उपासक त्याला म्हणाला, “भंदत, भगवंताला माझा शिरसाष्टांग नमस्कार सांगा आणि म्हणा कीं, अस्सजि आणि पुनब्बसुक ह्यांनी असभ्याचार करून आमच्या गांवाची पुष्कळ हानि केली आहे. तेव्हां भगवंतानें येथें चांगले भिक्षु पाठवावे.” त्याने ही गोष्ट कबूल केली; व श्रावस्तीला जाऊन भगवंताला हें सर्व वर्तमान सांगितलें. तेव्हां भगवान् सारिपुत्त आणि मोग्गल्लान ह्यांना म्हणाला, “तुम्हीं हि जाऊन त्या दोघां भिक्षूंना कीटागिरीहून हांकून लागवा.” सारिपुत्त आणि मोग्गल्लान म्हणाले, “पण भदंत, ते दोघे भिक्षु मोठे तापट आणि कर्कश आहेत.” भगवान् म्हणाला, “तर तुम्हीं पुष्कळ भिक्षु बरोबर घेऊन जा, व ह्याप्रमाणें प्रव्राजनीय कर्म करा:- अस्सजि व पुनब्बसुक ह्या दोघांनाहि त्यांच्या आपत्तींची आठवण द्यावी; व सर्मथ भिक्षूनें संघाला विज्ञप्ति करावी: हे भिक्षु पापाचारी आहेत व उपासकांची बेअब्रु करणारें आहेत. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघाने ह्यांना प्रव्रजनीय कर्म करावें. ह्या भिक्षूंनी कीटागिरि येथें राहतां कामा नये. ही विज्ञाप्ति झाली. नंतर कोणी हरकत घेतली नाही म्हणजे प्रव्रजनीय कर्म केलें असें समजावें.”

“जो भिक्षु प्रव्रजनीय कर्म केलें असतां त्या ठिकाणाहून निघून जाऊन नीट रितीनें वागेल त्याला संघानें योग्य वाटल्यास माफी करावी (विज्ञाप्ति वगैरे पू्र्वीप्रमाणें).”

प्रतिस्मारणीय कर्म (क्षमा मागावयास लावणें)

७५. त्या काळीं सुधर्म नांवाचा भिक्षु मक्षिकाषंड येथें रहात होता. चित्रगृहपति त्याच्याच मार्फत इतर भिक्षूंना आमंत्रण करीत असे. एके वेळीं सारिपुत्त महामोग्गल्लान वगैरे प्रसिद्ध भिक्षु मक्षिकाषंडाला आले. चित्रगृहपतीनें सुधर्म भिक्षूला विचारल्यावांचून त्यांना आपल्या घरीं भिक्षा ग्रहण करण्यास आमंत्रण केलें; व नंतर सुधर्म भिक्षुलाहि आमंत्रण दिलें. पण आपणास कळविल्यावांचून इतरांस आमंत्रण दिल्याबद्दल रागावून त्यानें तें स्वीकारलें नाही. दुसर्‍या दिवशीं जेवण्याचे वेळीं सुधर्म भिक्षु चित्रगृहपतीच्या घरीं गेला; व त्याच्या पूर्वजांवरून त्याला लागू पडेल असें वर्मीं बोलला. बुद्धोपदेश सांगण्याचें सोडून वर्मी शब्द बोलल्याबद्दल चित्रगृपतिनें सुधर्म भिक्षूला दोष दिला. पुढें सुधर्म भिक्षु श्रावस्तीला आला, व त्यानें घडलेली गोष्ट भगवंताला सांगितली. भगवंतानें वर्मीं शब्द बोलल्याबद्दल सुधर्मला दोषी ठरविलें; व चित्राची त्याला माफी मगावयास सांगितली. ह्या प्रकरणीं भगवान् भिक्षूंला म्हणाला, “जो भिक्षु गृहस्थांच्या हानीसाठीं खटपट करतो, विघ्न उत्पन्न होण्यासाठीं खटपट करतो, त्या गांवांतून त्यांनी निघून जावें अशी खटपट करतो, गृहस्थांना शिवीगाळ देतो व त्यांच्यामध्यें भांडणें लावतो अशा भिक्षूला संघानें त्या गृहस्थांची माफी मागावयास लावावें.”

त्याप्रमाणें संघानें विज्ञाप्ति करून व त्रिवार जाहीर करून सुधर्म भिक्षूनें चित्राची माफी मागावी असा ठराव केला. पण सुधर्म चित्राकडे जाण्यास लाजूं लागला. तेव्हां अशा प्रसंगी संघानें दुसरा एक भिक्षु साथीदार द्यावा अशी भगवंतानें अनुज्ञा दिली. “ज्या गृहस्थाचा अपराध केला असेल त्याची क्षमा मागितली. म्हणजे व हा भिक्षु नीट रितीनें वागूं लागला म्हणजे संघानें त्याला माफी करावी.”