तेव्हां भगवान् उपसेनाला म्हणाला, “ही तुझी मंडळी फार चांगली दिसते. त्यांना तूं कसें काय शिकवितोस?” उपसेन म्हणाला, “भदंत, जो माझ्याजवळ येऊन उपसंपदा मागतो त्याला मी ह्मणतों कीं, मी अरण्यक, पिंडपातिक आणि पांसुकूलिक आहें; जर तूंहि आरण्यक, पिंडपातिक आणि पांसुकूलिक होशील तुला मी उपसंपदा देईन. जर त्यानें ही गोष्ट कबूल केली तर त्याला उपसंपदा देतों; नाहीं तर देत नाहीं. त्याचप्रमाणें जो निश्रय मागतो त्यालाहि ही गोष्ट पसंत पडल्यास निश्रय देतों नाहीं तर देत नाहीं. ह्याप्रमाणें माझ्या मंडळी मी शिकवितों.” भगवान् म्हणाला, “फार चांगलें. पण उपसेन श्रावस्ती येथील संघानें केलेला नियम तुला माहीत आहे काय ?” त्यानें, नाहीं असें उत्तर दिल्यावर भगवंतानें तो नियम त्याला सांगितला. त्यावर उपसेन म्हणाला.
“आम्ही बुध्दाचे श्रावक भलताच नियम करीत नसतों; व केलेला मोडत नसतों; आणि नियमानुसार वागत असतों. तेव्हां श्रावस्तींतील संघ आपला नियम पाळीलच. त्यावर त्याची स्तुति करून भगवान् म्हणाला, “उपसेन, जे भिक्षु आरण्यक, पिंडपातिक आणि पांसुकूलिक व्रत पालन करतात त्यांना वाटेल ते माझ्या भेटीस येण्याला मी परवानगी देतों.” त्या काळीं उपसेनाला पाचित्ति आपत्ति लागू करण्याच्या उद्देशानें कांहीं भिक्षु दरवाजा बाहेर उभे होते. जेव्हा आपल्या मंडळीसह उपसेन बाहेर आला. तेव्हां त्या भिक्षूंनीं श्रावस्ती येथील संघानें केलेला नियम त्याला कळविला. त्यावर आरण्यक, पिंडपातिक आणि पांसुकूलिक भिक्षूंना वाटेल तेव्हां भेटीस येण्यास भगवन्तानें परवानगी दिली आहे, असें त्यानें त्यांस सांगितलें.
ही गोष्ट जेव्हां प्रसिद्ध झाली तेव्हां भिक्षु भगवंताच्या भेटीच्या इच्छेनें आपली आंथरुणें टाकून देऊन आरण्यक व्रत व पिंडपातिक व्रत व पांसुकूलिक व्रत अंगीवर लागले. तीन महिन्यांनंतर भगवान् भिक्षूंचीं निवासस्थानें पहात असतां त्यात तीं आंथरुणे दिसून आलीं; व हीं आंथरुणें कोणी टाकून दिलीं आहेत असा त्या भिक्षूंना प्रश्न केला. भिक्षूंनीं त्याला सर्व वर्तमान सांगितलें. ह्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून भगवंतानें नियम घालून दिला तो असा:-
बसण्याचें आसन करविणार्या भिक्षूनें जुन्या आसनांपैकीं बदलण्यासाठीं एक चौफेर सुगतवितस्ति भाग घ्यावा. जर अ... भाग न घेतां बसावयाचें आसन बनवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१५।।
३५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहातात होता. त्या काळीं कोसल देशांत प्रवास करीत श्रावस्तीला येत असतां वाटेंत एका भिक्षुला (..) मिळाली. तिचें उत्तरासंगांत गाठोडें बांधून तो चालला. त्याला पाहून, (..) पैसे देऊन तूं ही लोंकर घेतलीस, व तिच्यावर फायदा काय होईल, अशा रितीनें लोक त्याची थट्टा करूं लागले. त्यामुळें तो लाजला, आणि श्रावस्तीला आरामांत आल्यावर त्यानें ती लोंकर फेंकून दिली. असें कां केलेंस, असा भिक्षूंनीं प्रश्न केला. तेव्हां तो म्हणाला, “ह्या लोंकरीसाठीं मला लोकांनीं केलेली थट्टा सहन करावी लागली.” भिक्षु म्हणाले, “ही लोंकर तूं किती दुरून आणलीस?” तो म्हणाला, “मी ती तीन योजनांपेक्षा जास्त अंतरावरून आणली.” हें त्याचें (...) सज्जन भिक्षूंला आवडलें नाहीं. त्यांनी तें भगवंताला सांगितलें, व भगवंतानें त्या भिक्षूचा निषेध करून नियम घालून दिला तो असा:-
वाटेंत भिक्षूला लोंकर मिळाली तर गरज असल्यास त्यानें ती घ्यावी, व दुसरा नेणारा नसेल तर तीन योजनांपर्यत स्वत: न्यावी त्यापेक्षा जास्त अंतरावर-दुसरा नेणार नसतांहि-घेऊन जाईल, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१६।।
३६. बुद्ध भगवान् शाक्य देशांत कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु भिक्षुणींला लोंकर धुवावयास लावीत, रंगवावयास लावीत व मोकळी करावयास लावीत. त्यामुळें त्यांना अधिशील, अधिचित्त व अधिप्रज्ञा ह्यासंबंधानें शिकण्यास व विचारण्यास अवकाश मिळत नसे. महाप्रजाती गोतमी भगवंताच्या दर्शनाला गेली असतां, भिक्षुणी मोठ्या दक्षतेनें वागतात कीं नाहीं, असा भगवंतानें तिला प्रश्न केला. ती म्हणाली, “भिक्षुणीला सध्या दक्षता कुठली? षड्वर्गीय भिक्षु त्यांना लोंकर धुवावयास लावतात, रंगवावयास लावतात. व मोकळी करावयास लावतात. त्यामुळें त्यांना सवडच मिळत नाहीं.” तिला भगवंतानें धर्मोपदेश केला, व ती तेथून निघून गेली. त्यानंतर भगवंतानें भिक्षूंना बोलावून ह्या प्रकरणीं चौकशी केली. तेव्हां त्या भिक्षुणी षड्वर्गीय भिक्षूंच्या अज्ञाती आहेत असें त्यास आढळून आलें, व षड्वर्गीयांचा निषेध करून त्यानें नियम घालून दिला तो असा:-
जो भिक्षु अज्ञाति भिक्षुणीला लोंकर धुवावयास लावील, रंगवावयास लावील किंवा मोकळी करावयास लावील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१७।।