परंतु शत्रुकाचें मन त्या महालांत रमेना. कांहीं तरी युक्ति करून भद्देचे अलंकार घेऊन पळून जाण्याची त्याला फार इच्छा झाली, व तो भद्देला म्हणाला, “मला तुला कांहीं सांगावयाचें आहे.” जणुं काय आपणाला हजार कार्षापण मिळाले आहेत इतका त्या त्याच्या एका शब्दानें भद्देला आनंद झाला, व ती म्हणाली, “आर्य, तुम्हांला जें सांगावयाचें असेल तें सांगा.”
श० :- तुझ्यामुळें मी जगलों असे तुला वाटतें. परंतु तें खरें नाहीं. ज्या वेळी मला पकडण्यांत आलें, त्याच वेळीं चोरांच्या कड्यावर राहणार्या देवतेला मीं नवस केला होता. त्यामुळें मी सुटलों. तेव्हां चल, आपण तो नवस पुरा करूं.
भद्देनें त्याच्या सांगण्याप्रमाणें नवसाची सर्व सिद्धता केली, व सर्व दागदागिने अंगावर घालून ती त्याबरोबर त्या कड्यावर गेली. तेथें पोंचल्यावर तो तिला म्हणाला, “आतां तुझी साडी सोडून सगळे दागिने काढून त्यांचे गांठोडें कर.
भद्दा :- पण आर्य, माझा अपराध तरी कोणता?
श० :- अग, मी नवस फेडण्यासाठीं आलों, हें तुला खरें वाटलें तरी कसें? मी ह्या देवतेचें काळीजसुद्धां फाडून खाईन. केवळ तुझे दागिने घेऊन निघून जावें येवढ्याच उद्देशानें मी तुला येथें आणलें.
भद्दा :- पण आर्य, हे दागिने आणि मीहि तुमचीच नाही काय?
श० :- आम्हांला ही प्रेमाची भाषा समजत नाही! तुझे दागिने हे तुझे दागिने आणि माझे ते माझे!”
भद्दा :- आतां एवढेंच जर करावयाचें असेल तर मला एवढें तरी करूं द्या कीं, अशी अलंकृत असतांनाच तुम्हांला पुढून आणि मागून एकदां आलिंगन देऊं द्या.”
शत्रुक म्हणाला, “ठीक आहे!”
तिनें पुढून आलिंगन दिलें व मागून आलिंगन देत असतां धक्का देऊन त्याला त्या कड्यावरून खालीं लोटलें. खालीं पडतां पडतांच शत्रुकाचा चुराडा झाला. तेव्हां तेथील वनदेवता म्हणाली, “सर्वच ठिकाणी पुरुष शहाणा होतो, असें नाही. त्या त्या प्रसंगीं चाणाक्ष स्त्रीहि आपलें शहाणपण दाखवितें.१”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- न सो सव्बेसु ठानेसु पुरिसो होति पण्डितो। इत्थी पि पण्डिता होति, तत्थ तत्थ विचक्खणा।। ही गाथा थेरी अपदानांत आहे, व ती मनोरथपूरणींतहि घेतली आहे.