[१५]
विडूडभ (विदुर्दभ)
पसेनदि राजाची बुद्धावर फारच भक्ति जडली होती. तो वारंवार जेतवनांत धर्मश्रवणासाठी जात असे, व भिक्षुसंघाला वस्त्रान्नादिक देत असे. आपल्या आणि बुद्धाच्या कुळाचा निकट संबंध व्हावा, या हेतूनें त्यानें शाक्याच्या कुळांतील एका कन्येला आपली पट्टराणी करण्याचा बेत केला.
पण, शाक्यराजे मोठे अभिमानी असत. ते कोसलराजाच्या कुलापेक्षां आपलें कुल श्रेष्ठ समजत. पसेनदीनें जेव्हा कन्येची मागणी केली, तेव्हां शाक्यांना मोठी पंचाईत पडली. पसेनदीचें सामर्थ्य शाक्यांपेक्षां पुष्कळ पटींनीं मोठें होतें. अर्थात शाक्यांना कोसलराजाची मागणी उघडपणें नाकूबल करतां येईना. त्यांनीं सर्वांनुमतें अशी युक्ति योजिली, कीं, महानामा शाक्याची दासीकन्या वासभक्षत्रिया हिला महानामानें आपलीं कन्या म्हणून कोसलराजाला द्यावी.
कोसलराजाच्या अमात्यांनां ती मुलगी पसंत पडली. पण पसेनदीला शाक्यराजे आपणाला ठकवितील, अशी शंका आल्यामुळें त्यानें आपल्या अमात्यांनां असा निरोप पाठविला, कीं “तुम्हीं जी कन्या पसंत केली, ती जर महानामा शाक्याच्या पंक्तीला बसून जेवीत असेल, तर ती वधू निश्चित करावी.”
कोसलराजाचा हा निरोप महानामाला समजला, तेव्हां शाक्यकुलाच्या रक्षणासाठी त्यानें आपल्या दासीच्या कन्येबरोबर एका पंक्तीला बसून भोजन केलें. या प्रसंगी कोसलराजाचे अमात्यहि हजर होते.
याप्रमाणें कोसलराजाचें शंकासमाधान झाल्यावर शुभमुहूर्तावर वासभक्षत्रियेशीं त्याचा विवाह झाला. राजानें तिला पट्टराणी केलें. कांही कालानें वासभक्षत्रिया गर्भवती होऊन नवमासान्तीं पुत्र प्रसवली. त्याचें नाव विडूडभ (विदुर्दभ) असें ठेवण्यात आले. बाळपणीं विडूडभ आपल्या आईला वारंवार म्हणे, कीं “साधारण लोक देखील आपल्या भाच्यांनां उत्सवाच्या दिवशी खेळणीं पाठवितात; पण माझे मामा किंवा आजोबा मला कांहीच पाठवीत नाहींत!”
“बाळ, तुझे मामा, आजोबा वगैरे मंडळी येथून फार दूर रहातात. तेव्हां तुला खेळणी, खाऊ वगैरे पाठविता येणें त्यांनां शक्य नाहीं,” असे म्हणून वासभक्षत्रिया आपल्या मुलाचें समाधान करीत असे.
विडूडभ सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आईला म्हणाला “मी एकदां आजोळीं जाऊन सगळ्या नातेवाइकांनां भेटणार आहें.”
वासभक्षत्रियेनें पुष्कळ अडचणी पुढें आणिल्या; पण त्यांनां न जुमानतां विडूडभानें बापाची आज्ञा घेऊन कपिलवस्तूला जाण्याचा आपला बेत निश्चित केला.
वासभक्षत्रियेंने महानामाला गुप्त निरोप पाठविला, कीं “माझा मुलगा तिकडे जात आहे, त्याला कोणत्याहि प्रकारे कमीपणानें वागवूं नये. आपण त्याला नीट रीतीनें वागविलें नाहीं, तर कोसलराजाची माझ्यावरच केवळ नव्हे, तर आपणावरहि फार इतराजी होईल.”