[५]
सात प्रकारची भार्या
भगवान् बुद्ध श्रावस्तीमध्यें अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात असतां एके दिवशीं सकाळीं आपलें पात्र आणि चीवर घेऊन अनाथपिंडिकाच्या घरीं गेला, व त्यानें मांडलेल्या आसनावर बसला. त्या वेळीं अनाथपिंडिकाच्या घरांत मोठा गलबला चालला होता. तो ऐकून बुद्धगुरू अनाथपिंडिकाला म्हणाला “हे गृहपति, तुझ्या घरच्या माणसांची कोण ही गडबड! जणूं काय धीवर मासे लुबाडीत आहेत!”
अनाथपिंडिक म्हणाला “भगवन्, ही माझी सून सुजाता मोठ्या घराण्यांतील मुलगी आहे. ती कोणाचीच पर्वा करीत नाही. ज्याच्या-त्याच्यावर संतापते.”
बुद्धानें सुजातेला बोलावून आणलें, आणि तिला विचारलें “ सुजाते, वधकासारखी, चोरासारखी, धन्यासारखी, आईसारखी, बहिणीसारखी, मित्रासारखी, आणि दासीसारखी अशा या सात प्रकारच्या भार्या सांगितल्या आहेत; त्यांपैकी तूं कोणत्या प्रकारची आहेस बरें?”
सुजाता म्हणाली “भगवन्, आपल्या या संक्षिप्त भाषणाचा मला अर्थ समजला नाहीं. मला ते नींट समजावून द्या.”
बुद्ध म्हणाला “नवर्याविषयीं जिच्या अंत:करणात प्रेमाचा लेश नाहीं, जिला केवळ पैशानेंच विकत घेतलें, अशी व्याभिचारिणी स्त्री मारेकर्यासारखी आहे, असें समजावें. नवर्यानें मिळवलेल्या धनांतून थोडेबहुत चोरून ठेवण्याची इच्छा करिते, ती चोरासारखी आहे, असें समजावें. जी काम करीत नाहीं पण पुष्कळ खाते, नवर्याला शिव्या देण्यात कसूर करीत नाहीं, आणि नवर्याची चांगली कामगिरी कस्पटाप्रमाणें लेखते, ती धन्यासारखी होय. जी आपल्या नवर्याची एकुलत्या एक पुत्राप्रमाणें काळजी घेते, आणि नवर्यानें मिळविलेल्या संपत्तीचा संभाल करते, त्या स्त्रीला आईची उपमा देण्यांत येते. जशी धाकटी बहीण वडील भावाला मान देत असते, तशी जी स्त्री आपल्या नवर्याला मान देते व त्याच्या वचनांत वागते, तिला भगिनीची उपमा देत असतात. जी पतीला पाहिल्याबरोबर अत्यंत हर्षभारित होते, जणूं काय एकदा मित्र आपल्या मित्राला चिरकाळानें भेटत आहे, अशा कुलीन आणि शीलवती भार्येला मित्राची उपमा देत असतात. नवरा संतापला, तरी जी संतापत नाहीं, एवढेंत नव्हें तर जिच्या अंत:करणात नवर्याविषयीं वाईट विचार कधीहि येऊं शकत नाहीं, तिला दासीसारखी भार्या असें म्हणतात. सुजाते, या सातांपैकीं तूं कोणत्या प्रकारची भार्या होऊं इच्छितेस?”
सुजाता म्हणाली “भगवन्! आजपासून मी माझ्या पतीची दासीसारखी भार्या होईन.”