(२३)
चार स्मृत्युपस्थानें (जागृतीची साधनें)
एके समयीं बुद्धगुरू कुरुराष्ट्रामध्यें कम्मासदम्म (कलाषदम्य) नांवाच्या शहरी राहत असतां, भिक्षूंनां उद्देशून म्हणाला, "भिक्षुहो, मनुष्यप्राण्यांची शुद्धि होण्यासाठी, शोक आणि खेद यांचा अतिक्रम करण्यासाठीं, दु:ख आणि निर्वाणाचा अनुभव घेण्यासाठी चार स्मृत्युपस्थानें हाच कायतो मार्ग आहे. आपल्या देहाचें यथार्थतया अवलोकन करणें, वेदनांचे यथार्थतया अवलोकन करणें, चित्ताचें यथार्थतया अवलोकन करणें, आणि मनोवृत्तींचें यथार्थतया अवलोकन करणें, हीं चार स्मृत्युपस्थानें होत.
"भिक्षुहो, एकादा भिक्षु अरण्यांत झाडाच्या खाली, किंवा एकांतांत मांडी घालून आणि मानेपासून कंबरेपर्यंत आपला देह सरळ ठेवून, बसतो. तो जागृत अंत:करणानें श्वास आंत घेतो, व जागृत अंत:करणानें श्वास बाहेर सोडितो. आपले आश्वास आणि प्रश्वास दीर्घ आहेत कीं ऱ्हस्व आहेत, याची त्याला पूर्ण स्मृति असते. सर्व देहाविषयीं जागृति ठेवून आश्वासप्रश्वास करण्याचा तो अभ्यास करितो. जसा एकादा हुषार कांतारी किंवा त्याचा हुषार चेला आपण दोरी जोरानें ओढतों किंवा हळू ओढतों हें पक्कें जाणतो, तसाच हा भिक्षु आपण दीर्घ किंवा ऱ्हस्व आश्वासप्रश्वास करीत आहों, हें पक्केपणीं जाणतो. याप्रमाणे तो आपल्या देहाचें यथार्थतया अवलोकन करितो.
"तो जात असतांना आपण जात आहों याचें स्मरण ठेवितो; उभा असतांना उभे आहों याचे स्मरण ठेवितों; बसला असतांना बसलों आहों याचें स्मरण ठेवितो; व अंथरुणावर पडल्यावर आपण अंथरुणावर पडलों आहों याचें स्मरण ठेवितो. देहाच्या सर्व क्रियांचे त्याला ज्ञान असतें. याप्रमाणें तो आपल्या देहाचें यथार्थतया अवलोकन करितो.
"तो जाण्यायेण्यांत, इकडेतिकडे पहाण्यांत, बसण्याउठण्यांत, पात्रचीवर धारण करण्यांत, जेवण्यांत, खाण्यांपिण्यांत, शौचमुखमार्जनादि करण्यांत, बोलण्याचालण्यांत स्मृति ठेवितो. (त्याच्या सर्व क्रिया स्मृतिपूर्वक होत असतात.) याप्रमाणें तो आपल्या देहाचें यथार्थतया अवलोकन करितो.
"आणखी तो आपल्या देहाचें पायांपासून केंसांपर्यंत अवलोकन करितो. या देहामध्ये केश, लोम, नख, दंत, त्वचा, मांस, स्नायु, अस्थि, अस्थिमज्जा, वृक्क, हृदय, यकृत्, क्लोम, प्लीहा, फुप्फुस, आंतडे, आंतड्याची दोरी, कोठ्यांतील पदार्थ, करीष, पित्त, श्लेष्म, पू, रक्त, स्वेद, मेद, अश्रु, वसा, थुंकी, शेंबूड, लस आणि मूत्र हे पदार्थ आहेत. एकाद्या टोपलींत निरनिराळीं धान्यें भरलेलीं असलीं, तर ती टोपली सोडून एकादा डोळस मनुष्य तीं निराळीं काढूं शकेल- हे मूग आहेत, हे तांदूळ आहेत, हे उडीद आहेत आणि हे तीळ आहेत, हें तो दाखवूं शकेल. त्याचप्रमाणे हा (योगी) केश, लोम इत्यादि आपल्या देहांत वसत असलेल्या अशुचि पदार्थांचे यथार्थतया अवलोकन करितो.
"तो स्मशानांत जाऊन तेथें पडलेलीं निरनिराळ्या त-हेची प्रेतें पहातो. एकादें प्रेत सुजून मोठें झालेले असतें, एकादें कावळेकुत्रीं, इत्यादि प्राण्यांनी खाऊन छिन्नविच्छिन्न केलेलें असतें, तर एकाद्याच्या अस्थिच शिल्लक राहिलेल्या असतात. अशा प्रेतांकडे पाहून तो असा विचार करितो कीं, `माझा देहदेखील अशाच स्थितीला पोहोंचणार आहे! या स्थितीपासून माझा देह मुक्त होणे शक्य नाही.' हा देह उत्पन्न होऊन नाश पावतो याचें तो स्मरण ठेवितो; देह अशा प्रकारचा आहे याचें स्मरण तो ठेवितो. तो अनासक्त होतो; जगामध्यें कोणत्याहि वस्तूची तो आसक्ति ठेवीत नाही. याप्रमाणें तो आपल्या देहाचें यथार्थतया अवलोकन करितो.
भिक्षुहो, एकादा भिक्षु आपल्या वेदनांचें अवलोकन करितो. तो सुखकारक वेदना अनुभवीत असला, तर आपण सुखकारक वेदना अनुभवीत आहों हे तो जाणतो; दु:खकारक वेदना अनुभवीत असला, तर आपण दु:खकारक वेदना अनुभवीत आहों हे तो जाणतो; सुखदु:विरहित वेदना अनुभवीत असला, तर सुखदु:खविरहित वेदना अनुभवीत आहों हें जाणतो. तो या वेदना लोभानें अनुभवितो किंवा अलोभानें अनुभवितो, याचें त्याला स्मरण असतें. अशा प्रकारें तो आध्यात्मिक किंवा बाह्य वेदनांचें यथार्थतया अवलोकन करितो. वेदना उत्पन्न होऊन विनाश पावतात, हें तो पहातो. आपल्या अंगी वेदना आहेत, याची त्याला स्मृति असते. स्मृति आणि ज्ञान मिळविण्यासाठीं तो अनासक्त होतो. इहलोकीं कशाचीहि आसक्ति ठेवीत नाही. याप्रमाणें भिक्षु वेदनांचे यथार्थतया अवलोकन करितो.