अष्टविनायक

गणपतीची आठ अतिप्राचीन मंदिरे, जिथे वसले आहेत स्वयंभू गणपती बाप्पा..!!


श्री सिद्धिविनायक



अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे सिद्धिविनायक. हे मंदिर पुण्यापासून जवळपास २०० किलोमीटर अंतरावर आहे. जवळच भीमा नदी आहे. हे क्षेत्र सिद्धटेक गावाच्या सीमेत येतं. हे गणपतीच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिर जवळ जवळ २०० वर्षं जुनं आहे. सिद्धटेक इथलं सिद्धिविनायक मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे. असं म्हटलं जाते की भगवान विष्णूंनी इथे सिद्धी प्राप्त केल्या होत्या.
हे मंदिर एका डोंगराच्या शिखरावर वसलेलं आहे. त्याचं मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. मंदिरात जाण्यासाठी एका डोंगराची सफर करावी लागते. येथील गणेशाची मूर्ती ३ फूट उंच आणि २.५ फूट रुंद आहे. मूर्ती उत्तरमुखी आहे. गणपतीची सोंड सरळ दिशेला आहे.