अष्टविनायक

गणपतीची आठ अतिप्राचीन मंदिरे, जिथे वसले आहेत स्वयंभू गणपती बाप्पा..!!


श्री गिरिजात्मज



अष्टविनायकातील पुढील गणपती आहे गिरिजात्मज. हे मंदिर पुणे - नाशिक महामार्गावर पुण्यापासून ९० किलोमीटरवर आहे. नारायणगावापासून या मंदिराचे अंतर १२ किलोमीटर आहे. गिरिजात्मज चा अर्थ आहे की गिरीजा म्हणजे पार्वतीचा पुत्र.
हे मंदिर एका डोंगरावर बौद्ध गुहांच्या जागी बांधण्यात आले. इथे लेण्याद्री पर्वतावर १८ बौद्ध गुहा आहेत, आणि त्यातील ८ व्या गुहेत गिरिजात्मज विनायक मंदिर आहे. या गुंफेला गणेश गुंफा असंही म्हटलं जातं. मंदिरात जाण्यासाठी ३०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. हे सबंध मंदिरच एक मोठा खडक फोडून तयार करण्यात आलं आहे.