अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणजे महागणपती. हे मंदिर पुण्यातील रांजणगाव इथे आहे. पुणे - अहमदनगर महामार्गावर पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसले आहे. या मंदिराचा इतिहास ९ व्या ते १० व्या शतकापासूनचा सांगितला जातो. मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. ते खूप भव्य आणि सुंदर आहे. इथल्या गणपतीच्या मूर्तीला महोतक म्हणूनही ओळखलं जातं. इथली गणपतीची मूर्ती अद्भुत आहे. प्रचलित माहितीनुसार मंदिराची मूळ मूर्ती तळघरात लपवलेली आहे. पूर्वी जेव्हा परप्रांतीयांनी इथे आक्रमण केलं तेव्हा त्यांच्यापासून मूर्तीचा बचाव करण्यासाठी ती तळघरात लपवण्यात आली होती.