गणपतीचे अष्टावतार

आता आम्ही तुम्हाला भगवान गणपतीच्या ८ अवतारांबद्दल माहिती देतो. बाकी देवतांप्रमाणेच गणपतीनेही असुरी किंवा राक्षसी शक्तींचा संहार करायला वेगवेगळे अवतार घेतले. गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये गणपतीच्या या अवतारांचे वर्णन वाचायला मिळते. आता माहिती घेऊ गणापतीच्या ८ अवतारांची. . .


महोदर


जेव्हा कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला, तेव्हा दैत्यगुरू शुक्राचार्यांनी मोहासुर नावाचा राक्षस तयार करून देवांच्या विरोधात उभा केला. मोहासुरापासून सुटका व्हावी यासाठी सर्व देवतांनी गणेशाची उपासना केली. तेव्हा गणपतीने महोदराचा अवतार घेतला. महोदराचे उदर म्हणजेच पोट खूपच मोठे होते. महोदर उंदरावर स्वार होऊन मोहासुराच्या नगरात पोचले तेव्हा मोहासुराने युद्ध न करताच गणपतीला आपला मित्र बनवले.