गणपतीचे अष्टावतार

आता आम्ही तुम्हाला भगवान गणपतीच्या ८ अवतारांबद्दल माहिती देतो. बाकी देवतांप्रमाणेच गणपतीनेही असुरी किंवा राक्षसी शक्तींचा संहार करायला वेगवेगळे अवतार घेतले. गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये गणपतीच्या या अवतारांचे वर्णन वाचायला मिळते. आता माहिती घेऊ गणापतीच्या ८ अवतारांची. . .


विकट


भगवान विष्णूंनी जालंधर च्या विनाशासाठी त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व भंग केले. त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. त्याचं नाव कामासूर. कामासुराने शिवाची उपासना करून त्रिलोकावर विजय प्राप्तीचा वर मागून घेतला. त्यानंतर त्याने इतर दैत्यांप्रमाणेच देवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा मग साऱ्या देवतांनी भगवान गणेशाची आराधना केली. तेव्हा भगवान गणेशांनी विकट रूपाने अवतार घेतला. विकट रूपातील गणपती मोरावर विराजमान होऊन प्रकट झाले. त्यांनी देवताना अभय वरदान देऊन कामासुराचा पराभव केला.