श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग ४

भावांत भक्ती, भक्तींत मुक्ती, आणि मोक्षबळांत सर्वशक्ती एकवटली आहे.

भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती । बळेविण शक्ती बोलो नये ॥१॥

निवांत राहाण्याच्या अभ्यासांनें दैवत त्वरित प्रसन्न होतें

कैसेनि देवंत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥२॥

दिननिशी सायास हाच प्रपंच.

सायास करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥

हरिजपानें प्रपंचाचे धरणें सुटतें

ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥