श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग १०

नामांत चित्त नसेल तर त्रिवेनीसंगमादि तीर्थे करुनही फुकट

त्रिवेणी संगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥

नामाला विन्मुख तो पापी

नामासि विन्मुख तो नर पापिया । हरिविन धांवया न पवे कोणा ॥२॥

पुराणप्रसिद्ध वाल्मिकांनी नाममहिमा गाईला आहे

पुराणप्रासंद्ध बोलिले वाल्मीक । नामें तिही लोक उद्धरीलें ॥३॥

हरिनामाचा जप करतो । त्यांची कुळपरंपरा शुद्ध होय

ज्ञानदेव म्हणें नाम जपे हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥