श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग १३

समसुखांवाचुन द्वैतबुद्धीला हरीची समाधी साधत नाही.

समाधी हरीची सम सुखेविण । न साहेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

दुजेपणाचा आभाव हेंच बुद्धीचे वैभव

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशवराज सकळसिद्धी ॥२॥

परमानंदांत मन नसेल तर रिद्धि सिद्धि ही अवघी उपाधिच होय.

रिद्धि सिद्धिनिधी अवघोच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाही. ॥३॥

सर्वकाळ हरीच चिंतन हेंच समाधान

ज्ञानदेव रम्य रमलें समाधान । हरीच चिंतन सर्वकाळ ॥४॥