श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग १६

एक नामच हरि

एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

समबुद्धीनामांत श्रीहारी समान होतो

समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥

देहादेही आणि सर्वां घटीं सहस्त्ररश्मी सुर्यप्रकाशक एक रामच आहे.

सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचे चित्तांत हरिपाठाचा नेम असल्यानें ते मागले जन्मीच मुक्त झाले

ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालो. ॥४॥