श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग २४

सर्वांघटी राम हाच शुद्ध भाव असुन त्याला घरुनच जपतपदि क्रिया आहेत

जपतप कर्मक्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भाव शुद्ध ॥१॥

संदेह टाकणें म्हणजे भाव धरणें व तें साध्य करण्याकरितां रामकृष्णाचा नित्य टाहो फोडला पाहिजे.

न संडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥

कुळांत गोतांत फार काय जातीतही शीलाही मात भावनायुक्त मजकानें त्वरित केली पाहिजे

जात वित्त गोत कुळशील मात । भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥

मनांतील रामकृष्ण ज्ञानेश्वरमहारांजांचे ध्यानीं असुन त्यांनीं वैकुंठांत घर केले.

ज्ञानदेवा ध्यांनीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥