गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय छत्तिसावा

त्या ग्रामामध्यें एक । विप्र येक होता रंक । भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्स्त्री ॥१॥

तो नेम धरुनी परान्न । सोडी, दंपती भोजन । द्याया आला महाजन । स्त्री जाऊनीं प्रार्थी गुरुसी ॥२॥

होता कंठ भरुनि दीन । गुरु विप्रा बोलावून । म्हणे इला जा घेऊन । तूं परान्न जेवाया ॥३॥

तीचें गार्‍हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून । गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥

तेथें मानिनी जेवितां । श्वसूकरोच्छिष्ट देतां । उठे पतीसह दुश्चिता । गुरुनाथा भेटती दोघे ॥५॥

नारी विनवी क्षमापून । गुरु म्हणे धालें कीं मन । द्विज म्हणे नेम टाळून । भ्रष्ट होवून गेलों मीं ॥६॥

अवश्य ही वैरीण । गुरु म्हणे पुरें शीण । मी माया दावून । केलें मन शुद्ध ईचें ॥७॥

ही नच इच्छील आता । सोडील परान्नाची वार्ता । न मोडली तुझी निष्ठा । दि़ज अडतां घे परान्न ॥८॥

प्रार्थी भूसूर कोठें जावें । अन्न कोणाचें वर्जावें । गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥

वर्जी तामस कुचरान्न । विधिनिषेधरहितान्न । दुष्प्रतिग्रह दुर्भक्षान्न । कन्यान्न सुत न होता ॥१०॥

त्यजीं निन्दकादिकान्न । जेवितांही श्राद्धान्न । षट्‌ प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जी ॥११॥

अग्नाधानिभागवतान्न । पवित्र करी ब्रह्मीष्ठान । तीर्थी क्षेत्री पर्वणीं दान । हीनदान कुदान न घे ॥१२॥

स्वाचारयुक्त नर । सर्व दोष करीं दूर । द्विज म्हणे सविस्तर । नित्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥

गुरु यापरी प्रार्थित । सांगे पराशरमत । उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतांदिकां वंदा ॥१४॥

व्हायाम्य मुख निशीं ऐक । दिवा संधी उदङ्‌मुख । नैऋत्यकोणी देख । मार्गोदकवर्जितदेशीं ॥

त्यजी हरित्तृण, शिरीं । वस्त्रधरीं जलदूरीं । मलमूत्रोत्सर्ग करीं । शौचकरी मृत्तोयानें ॥१६॥

गोळ्या मोठया आंवळ्यापरी । लिंगीं एकत्रि गुदावरी । सातसात पादकरीं । निम्मीं रात्री संकटी अर्ध ॥

हा द्विजवर्याचार । वर्णी वनी यतिश्वरां । द्वित्रिचतुगुर्णाचार । स्त्रीकुमारां दुर्गंधान्त ॥१८॥

होत साचविधी शूद्रा । विप्रें किजे चूळ बारा । आठ सहा चार ईतरां । अंतीं द्विराचमनें शुद्धीं ।

मुदा पुण्य मध्यस्नान । प्रातःकाळीं गोमयस्नान । यति सन्यासी त्रिस्नान । सुभगे शिरःस्ना न नित्य ।

शीतोष्णाम्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी । तर्पणादि बहिःस्नानासी । कीजे शिरसीं मृद्धारण ॥

अनामिकीं दर्भ पवित्र । बद्धशिख सोपवस्त्र । संध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जैसा ॥२२॥

मौंजी चौलादिकीं न भस्म । तदन्यत्र तें परम । सनक्षत्रसंध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥

चाक्षुष सूर्यदर्शन । प्रातःसंध्या अधम जाण । ह्याउलट रात्रौ जाण । उपस्थान सूर्येक्षणें ॥२४॥

त्या आधी, आचमन । प्राणायाम मार्जन । मंत्राचमन मार्जन । अघमर्षण अर्ध्वदान ॥२५॥

मनस्समाधानें द्या तीन । कालात्यय चौथे जाण । सूर्योदयविघ्नकारण । रक्षोगण मरती ह्यांनीं ॥

ह्या दुर्वारास्त्रें मारितां । दोष येतो, भूमी फिरतां । असावादित्य जपतां । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥

हो स्वस्से पानभूत । कर्म कीजे सदोदित । शुभासनीं न्यासहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥

जप मोजा अक्षमालेनें किंवा स्फटिकादिकाने । निष्फळ तो मुद्राविणें । समाधानें मौनें जपा ॥२९॥

लय भूल पडूं न द्यावी । छन्नमाला न पडावी । गायत्री हजार जपावी । कमी योजावे अशक्तत्वें ॥

वृद्धंत्वादि तारत्म्यें । जपिजे न धनकाम्यें । उभ्यानें दोन संध्ये । सायंसंध्येसी बसूनी ॥३१॥

उभें रहावें उपस्थानीं । दिशा देव द्विजां नमूनी । गुरुपादातें वंदुनि । विसर्जोनी द्यावी संध्या ॥३२॥

हो असा हा संध्याविधी । सायंप्रातर्होमविधी । कीजे स्वयें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥

हा आत्मस्त्री सुतादिकें । कीजे गव्यधान्यादिकें । धर्म करितां श्रमदुःखें । नच लेखे चित्ती विप्रा ॥

भोग कः पदार्थ द्विजा । कर्मे होयी शुद्धी निजा । आनंदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुख्य ॥

होम असा झाल्यावर । ब्रह्मयज्ञ कीजे बाहेर । ब्रह्मांजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥

विद्या हंकारवर्जित । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता । दोष नसें कसें पढतां । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥

कोणी वैश्वदेवोत्तर । करिती मध्यसंध्योत्तर । तर्पा देवर्षिपितर । सव्य निवीत्य पसव्येसी ॥३८॥

होविश्वात्माऽऽब्रह्मस्तंबांत । तर्पणें तृप्तयवाक्षत । देवर्षिलाकरिती तृप्‍त । पितरातृप्‍तकरिती तिला ॥३९॥

गृहीं न हें तिलतर्पण । निंद्यदिनीं मांगल्यीं न । दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥

हें करो जीवत्पिता । दोष अनवश्य करितां । मध्यान्हीं सूर्य येतां । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम षष्‍ट्‌त्रिंशो०