गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय एकोणचाळीसावा

एकविप्र सोमनाथ । तत्स्त्री वृद्धा वंध्या ख्यात । सेवी भावें गुरुनाथा । गुरु पुसती वांछा काय ॥१॥

ती कष्टो नी तयां म्हणे । अपुत्रा मी व्यर्थ शिणें । अश्वथाला भजतां जिणें । गेलें भेणें पुढती वाटे ॥२॥

पुढें मला होवो सुत । गुरु म्हणे कोण जाणत । पुढचें, आतां कन्यासुत । होवो म्हणे, ती गांठ बांधी ॥३॥

गुरुत्तम म्हणे हरीं । पिंपळाची निंदा न करीं । आम्ही सर्वदेव त्यावरी । ब्रह्मा सांगे नारदातें ॥४॥

श्रुतिस्मृती ज्याला गाती । त्याला करी मंदगति । प्रदक्षिणा लक्ष मिती । करीं अंतीं उद्यापन ॥५॥

द्यावे तिलस्वर्णाश्वत्थ । विप्रां भोजन दे निश्चित । होती तुजःकन्या सुत । नारी म्हणतसे देवा ॥६॥

मी दुर्ज्ञा ना वंचूं कशी । साठ वर्षे झालीं वयासी । होत नाहीं विटाळशी । तरी तसीच मी सेवी ॥७॥

ती त्यां न मुनी सेवि तशी । शीघ्र झाली विटाळशी । गर्भधरी पांचवे दिवशीं । कन्या ती सी झाली शुभा ॥८॥

परम हर्षें त्या कन्येसी । आणी नारी गुरुपाशीं । गुरु म्हणे हो सती ईसी । दीक्षित पति लाधेल ॥९॥

तुझे पोटीं मूर्ख शतायू । किंवा यावा बुध अल्पायू । ती म्हणे हो कां अल्पायू । दीर्घायू मूढ किमर्थ ॥१०॥

व्हावे हर्षद पंचसुत । तथा म्हणे गुरुनाथ । कन्ये घेऊन गृहाप्रत । ये हंसत ब्राह्मणी ती ॥११॥

झाला नंदन शीघ्र तिला । विद्वान सर्वगुणी भला । पांच पुत्र झाले त्याला । सर्वां झाला विस्मय ॥१२॥

तशीच कन्या दीक्षिताची । पत्‍नि झाली सती साची । कीर्ति पसरली त्यांची । श्रीगुरुची असी दया ॥१३॥

इति श्री०प०प०वा०स० सारे वृद्धवंध्याप्रसवो नामेकोन्चत्वारिंशो०