संत चोखामेळा - अभंग संग्रह २
संत चोखामेळा Updated: 15 April 2021 07:30 IST

संत चोखामेळा - अभंग संग्रह २ : अद्वैत

संत चोखामेळा - अभंग संग्रह २

अद्वैत   स्वस्थिति.

पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥

देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥

जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥

मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

. . .