संत चोखामेळा - अभंग संग्रह २
संत चोखामेळा Updated: 15 April 2021 07:30 IST

संत चोखामेळा - अभंग संग्रह २ : स्वस्थिति

संत चोखामेळा - अभंग संग्रह २

स्वस्थिति   स्वस्थिति

धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥

कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कां हो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तो देवा ॥३॥

चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥

. . .