संत चोखामेळा - अभंग संग्रह १
संत चोखामेळा Updated: 15 April 2021 07:30 IST

संत चोखामेळा - अभंग संग्रह १ : पंढरीमहिमा

संत चोखामेळा - अभंग संग्रह १

पंढरीमहिमा   पंढरीमहिमा

अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥

तो हा महाराज चंद्रभागे तटीं । उभा वाळुवंटीं भक्तकाजा ॥२॥

अनाथा कैवारी दीना लोभापर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥

चोखा म्हणे माझी दयाळु माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥

. . .