संत चोखामेळा - अभंग संग्रह १
संत चोखामेळा Updated: 15 April 2021 07:30 IST

संत चोखामेळा - अभंग संग्रह १ : नाममहिमा.

संत चोखामेळा - अभंग संग्रह १

पंढरीमहिमा   नाममहिमा.

सुखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥

तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥

नलगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥

बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

. . .