संत निवृत्तिनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ Updated: 15 April 2021 07:30 IST

संत निवृत्तिनाथांचे अभंग : संत निवृत्तीनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तीनाथांचे अभंग   संत निवृत्तीनाथांचे अभंग

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट । करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥

वाळलें अंबर अमृततुषार । झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥

देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे । पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥

निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान । खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥

. . .