
संत निवृत्तीनाथ
Updated: 15 April 2021 07:30 IST
संत निवृत्तिनाथांचे अभंग : संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तिनाथांचे अभंग
अनंत रचना हारपती ब्रह्मांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
तें रूप राजस वसुदेव भोगी । देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥
विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी । निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा । भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥
. . .