भजन : भाग १
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

भजन : भाग १ : पहा कसा सजला गणेश गौरीनंदना

भजन हे मुळात देव किंवा देवीची स्तुती करण्यासाठी गायिले जाणारे गाणे आहे. साधारणपणे भारतीय पध्दतीत उपासना करताना भजने म्हटली जातात. भजन मंदिरात सुद्धा गायली जातात.

गौरी पुत्र गजानन   गणपति भेटि तुम्ही द्या हो

पहा कसा सजला गणेश गौरीनंदना ॥धृ॥

पिवळा पिंताबर नेसुनी जरीचा, हिरे मुकुटावरी शोभता राहिला ॥१॥

फुल गुलाबी चमेलीचे आणूनी, सुवास बहु सुटला मधुर चाफा चंदना ॥२॥

दुर्वा हरळी आवड मनाची धूप दिपाचीं आरती करुनी, मोदक फराळ करी खाताना गोडी लागेना ॥३॥

संगे शारदा ब्रह्माकुमारी मोरावरी बसुनी आली गायना ॥४॥

भाद्रपद मासी शुद्ध सप्तमीच्या , दिवशी जानकी नररा मध्ये आनंद गगनात माईना ॥५॥

. . .