पाळणा (बारसे)
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

पाळणा (बारसे) : रावणा मारून माझे माये गे ...

बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी

हरिनाम गोड झालें काय सांग...   संपूर्ण विश्चाचा आत्म्याच...

रावणा मारून माझे माये गे । बिभीषण लंकेस स्थापिलास कायगे । अयोध्येसी आलीस कायगे ।
माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे । विठ्ठल मायगे ॥१॥
रुसुनी आली रखुमाबाईगे । तिच्या मागें तूं धांवलीस कायगे ।
संगें घेऊनियां गोपाळ गायगे । मम ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥२॥
सत्ये राधिकेचे पायींगे । सोडूनी द्वारकेचा ठावगे ।
आलीस कायगे ।  माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥३॥
धन्य पुंढलीक भक्त मायगे । त्याणें विटेवर उभा केला कायगे ।
नामा म्हणे माझे मायगे । माझे ह्रदय-मंदिरा राहेंगे ॥४॥

. . .