पाळणा (बारसे)
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

पाळणा (बारसे) : शिवाजीचा पाळणा

बारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी

कृष्णाचा पाळणा   पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)

तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।

मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥

झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।

बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥

तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।

पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥१॥

चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।

झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥

नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥

बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥

कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।

आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥२॥

. . .