लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : पराभवसुत्तं 4

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

पराभवसुत्तं 3   पराभवसुत्तं 5

इति हेतं विजानाम, अट्टमो सो पराभवो |
नवम भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||१७||

हा आठवा पराभव आम्हांस समजला | भगवान् नववें परभवाचें कारण कोणतें तें सांग ||१७||

सेहि दारेहिऽसन्तुट्ठो वेसियासु पदिस्सति |
दिस्सति परदारेसु, तं पराभवतो मुखं ||१८||


स्वस्त्रीनें संतुष्ट न होतां जो वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो | तें (त्याच्या) पराभवाचे कारण होय ||१८||

इति हेतं विजानाम, नवमो सो पराभवो |
दसमं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||१९||

हा नववा पराभव आम्हांस समजला | भगवन् दहावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग ||१९||

अतीतयोब्बनो पोसो आनेति तिम्बरुत्थनिं |
तस्सा इस्सा न सुपति, तं पराभवतो मुखं ||२०||


वयातीत पुरुष तरुण स्त्रीशीं लग्न करितो व त तिच्या ईर्षेनें निजत नाहीं | तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय ||२०||

इति हेतं विजानाम, दसमो सो पराभवो |
एकादसमं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||२१||


हा दहावा पराभव आम्हांस समजला | भगवन् अकरांवे पराभवाचे कारण कोणतें तें सांग ||२१||
. . .