लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : वसलसुत्तं 3

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

वसलसुत्तं 2   वसलसुत्तं 4

यो मातरं वा पितरं वा जिण्णिकं गतयोब्बनं |
पहु सन्तो न भरति तं जञ्ञा वसलो इति ||९||


जो समर्थ असून आपल्या वयातील वृद्ध आईबापांचा सांभाळ करीत नाहीं, त्याला वृषल समजावें ||९||

यो तरं मातरं वा पितरं वा भातरं भगिनिं ससुं |
हन्ति रोसेति वाचाय तं जञ्ञा वसलो इति ||१०||


आई, बाप, भाऊ, बहिण किंवा सासू यांस जो मारतो किंवा शब्दांनी चिडवतो, त्याला वृषल समजावें ||१०||

यो अत्थं पुच्छितो सन्तो अनत्थमनुसासति |
पटिच्छन्नेन मन्तेति तं जञ्ञा वसलो इति ||११||

फायद्याची गोष्ट विचारली असतां जो हानीच्या गोष्टीचा उपदेश करितो किंवा संदिग्ध बोलतो, त्याला वृषल समजावें ||११||

यो कत्वा पापक कम्मं मा मं जञ्ञा ति इच्छति |
यो पटिच्छन्नकम्मन्तो तं जञ्ञा वसलो इति ||१२||

जो पापकर्म करून तें लोकांनी जाणूं नये अशी इच्छा धरतो ज्याची कर्में गुप्त रीतींनें चालतात, त्याला वृषल समजावे ||१२||

यो वे परकुलं गन्त्वा भुत्वान सुचि भोजंन |
आगतं न पटिपूजेति तं जञ्ञा वसलो इति||१३||


जो परक्याच्या घरीं जाऊन पाहुणचार घेतो, पण आपल्या घरीं आल्यावर त्या गृहस्थाचा आदरसत्कार करीत नाही, त्याला वृषल समजावे. ||१३||

यो ब्राह्मणं वा समणं वा अञ्ञं वा पि वनिब्बकं |
मुसावादेन वञ्चेति तं जञ्ञा वसलो इति ||१४||

जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुस-या गरीब माणसाला खोटें बोलून ठकवितो, त्याला वृषल समजावें ||१४||
. . .