लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : वसलसुत्तं 4

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

वसलसुत्तं 3   वसलसुत्तं 5

यो ब्राह्मणं वा समणं वा भत्तकाले उपट्ठिते |
रोसेति वाचा न च देति तं जञ्ञा वसलो इति ||१५||

जो भोजनाच्या वेळीं दारीं आलेल्या ब्राह्मणाला किंवा श्रमणाला रागें भरतो व कांहिं देत नाहीं, त्याला वृषल समजावें ||१५||

असतं योध पब्रूति मोहेन पळगुण्ठितो |
किश्चिक्खं निजिगिंसानो तं जञ्ञा वसलो इति ||१६||

मोहानें वेष्टित होऊन थोडयाबहुत फायद्यासाठी जो भलत्यासलत्या गोष्टी सांगतो, त्यास वृषल समजावें ||१७||

स्त्रो चऽत्तानं समुक्कंसे परं च मवजानति |
निहिनो सेन मानेन तं जञ्ञा वसलो इति ||१७||

जो आपल्या गर्वानें भ्रष्ट होऊन आत्मस्तुति आणि परनिंदा करितो, त्याला वृषल समजावें ||१७||

रोसको कदरियो च पापिच्छो मच्छरी सठो |
अहिरिको अनोत्तापी तं वसलो इति ||१८||


इतरांना चिडविणारा, कृपण, पापेच्छ, मत्सरी, शठ निर्लज्ज | आणि लोकापवादाचें भय न बाळगणारा, त्याला वृषल समजावें ||१८||

यो बुद्धं परिभासति अथ वा तस्सं सावकं |
परब्बाजं गहठ्ठं वा तं ज़ञ्ञा वसलो इति ||१९||


जो बुद्धाला, त्याच्या श्रावकाला, दुस-या एखाद्या परिव्राजकाला अथवा गृहस्थाला शिव्या देतो, त्याला वृषल समजावे ||१९||

यो वे अनरहा सन्तो अरहं पटिजानति |
चोरो सब्रह्मके लोके एक खो वसलाधमो |
एते खो वसला वुत्ता मया वो यो पकासिता ||२०||


जो अरहन्त  नसून आपणांस अरहन्त म्हणवतो, तो सर्व जगांत चोर होय. तो वृषलाधम होय || ज्यांना मी वृषल म्हणतों, त्यांचे हे स्पष्टीकरण तुमच्यासाठीं केलें आहे ||२०||
. . .