लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : वसलसुत्तं 5

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

वसलसुत्तं 4   वसलसुत्तं 6

न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो|
कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो ||२१||

जन्मानें वृषल होत नाहीं व जन्मानें ब्राह्मण होत नाहीं | कर्मानें वृषल होतो, व कर्मानें ब्राह्मण होतो ||२१||

तदमिना पि जानाथ यथा मेदं निदस्सनं |
चण्डालपुत्तो सोपाको मातंगो इति विस्सुतो ||२२||

ह्याला मी एक उदाहरण देतों | कुत्र्याचें मांस खाणा-या चांडाळाचा एक पुत्र मातंग ह्या नांवाने प्रसिद्ध होता ||२२||

यो यसं परमं पत्तो मातंगो यं सुदुल्लभं |
आगच्छुं तस्सुपट्ठानं खत्तिया ब्राह्मणा बहू ||२३||

त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ यश मिळालें | त्याच्या सेवेस पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत ||२३||

देवयानं अभिरुय्ह विरजं सो महपथं |
कामरागं विराजेत्वा ब्रह्मालोकूपगो अहु |
न नं जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया ||२४||

विषयवासनेचा क्षय करणा-या थोर मार्गाचा व देवयानाचा (समाधीचा) अवलंब करून तो ब्रह्मलोकाला गेला || ब्रह्मलोकी उत्पन्न होण्यास त्याचा जन्म त्याला आड आला नाही ||२४||

अज्झायककुले जाता ब्राह्मण मन्तबन्धुनो ||
ते च पापेसु काम्मेसु अभिण्हमुपदिस्सरे ||२५||

स्वाध्यायसंपन्न ब्राह्मणकुलांत जन्मलेले व स्वत: वेदमंत्र जाणणारे ब्राह्मण पुष्कळदां पापकर्मे आचरीत असलेले पाहण्यांत येतात ||२५||

. . .