लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : उग्गसुत्तं

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

वसलसुत्तं 6   अप्पमादसुत्तं

उग्गसुत्तं

एवं मे सुतं | एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे || अथ खो उग्गो रजमहामत्तो येन भगवा तेनुपसंकमि | उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि | एकमन्तं निसिन्नो खो उग्गो राजमहामत्तो भगवन्तं एतदवोच || अच्छरियं भन्ते अब्भुतं भन्ते यावअड्ढोवायं भन्ते मिगारो रोहणेय्यो यावमहद्धनो यावमहाभोगो ति || किवअट्ठो पनुग्ग मिगारो रोहणेय्यो कीवमंहद्धनो ति || सतं भन्ते सतसहस्सानं हिरञ्ञस्स | को पन वादो रूपियस्सा ति || अत्थि को उग्ग एतं धन | नेतं नत्थी ति वदामि || तं च खो साधारणं अग्गिना उदकेन राजूहि चोरोहि अप्पियेहि दायादेहि || सत्त खो इमानि उग्ग धनानि असाधारणानिअग्गिना उदकेन राजूहि चोरेहि अप्पियेहि दायादेहि | कतमानि सत्त | सद्धाधनं | सीलधनं | हिरिधनं | ओत्तप्पधनं | सुतधनं | चागधनं | पंञ्ञाधनं || इमानि खा उग्ग सत्त धनानि असा धारणानि अग्गिना उदकेन राजूहि चोरोहं अप्पियेहि दायादेही ति ||


असें मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या आरामांत राहत होता || तेव्हां उग्र राजमहामात्य भगवन्ताजवळ आला आणि भगवन्ताला वंदन करून एका बाजूस बसला || एका बाजूस बसून उग्र राजमहामात्य भगवन्ताला म्हणाला :- किती आश्चर्याची गोष्ट कीं, हा मिगार रौहणेय एवढा श्रीमंत, एवढा धनवान् आहे || (भगवान म्हणाला ) हे उग्र, हा मिगार रौहणेय केवढा श्रीमंत व केवढा धनवान् आहे बरें || भदन्त, त्याच्याजवळ एक कोटि नुसतें सोन्याचें नाणें निघेल | मग रुप्याच्या नाण्याची गोष्ट काय सांगावी || हे उग्र, हें धन आहे | हें नाही असे नाहीं | पण तें अग्नि, उदक, राजा, चोर, अप्रिय दायाद यांच्या तडाक्यांत सांपडण्याचा संभव असतो || परंतु, हे उग्र, अशी सात प्रकारची धनें आहेत कीं जी अग्नि, उदक, राजा, चोर, अप्रिय दायाद यांच्या तडाक्यांत सांपडण्याचा संभव नाहीं | तीं सात कोणतीं | श्रद्धाधन | शीलधन | लज्जाधन | लोकापवादभयधन | विद्याधन | स्वार्थत्यागधन | प्रज्ञाधन | हे उग्र, हीं सात धने अग्नि, इदक, राजा, चोर, अप्रिय दायाद यांच्या तडाक्यांत सापडण्याचा संभव नाहीं ||

सद्धाधनं सीलधनं हिरिओत्तप्पियं धनं ||
सुतधनं च चागो च पञ्ञा वे सत्तमं धन ||१||


श्रद्धाधन, शीलधन, लज्जा आणि लोकापवादभय हें धन, विद्याधान, स्वार्थत्यागधन आणि प्रज्ञा हें सातवें धन होय ||१||

यस्स एते धना अत्थि इत्थिया पुरिसस्स वा ||
स वे महद्धनो लोके अजेय्यो देवमानुसे ||२||


ज्या स्त्रीला किंवा पुरुषाला हीं सात धनें मिळातात तोच मोठा श्रीमंत होय | मनुष्यलोकीं आणि देवलोकीं त्याचा पराजय होत नाहीं ||२||

तस्मा सद्धं च सीलं च पसादं धम्मदस्सनं ||
अनुयुञ्जेथ मेधावी सरं बुद्धान सासनं ति ||३||

म्हणून श्रद्धा, शील, प्रसाद आणि धर्मज्ञान हीं, बुद्धाचा उपदेश स्मरून शहाण्या मनुष्यानें वृद्धिंगत करावीं ||३||

उग्गसुत्तं निठ्ठितं
. . .