लघुपाठ
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

लघुपाठ : अप्पमादसुत्तं

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

उग्गसुत्तं   मेत्तसुत्तं 1

अप्पमादसुत्तं

एवं मे सुतं | एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे || अथ खो राजा पसेनदि कोसलो येन भगवा तेनुपसंकमि | उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि || एकमन्तं निसिन्नो खो राजा पसेनदि कोसलो भगवन्तं एकदवोच | अत्थि नु खो भन्ते एको धम्मो यो उभो अत्थे समधिगय़्ह तिट्ठति दिट्ठधम्मिकं चेव अत्थं संपरायिकं चा ति || अत्थि खो महाराज एको धम्मो यो उभो अत्थे समधिगय्ह तिट्ठति दिट्ठधम्मिकं चेव अत्थं संपरायिकं चा ति || कतमो पन भन्ते एको धम्मो यो उभो अत्थे समाधिगय्ह तिट्ठति दिट्ठधम्मिकं चेवा अत्थं संपरायिंक चा ति || अप्पमादो खो महाराज एको धम्मो उभे अत्थे समाधिगय्ह तिठ्ठति दिठ्ठधम्मिकं चेव अत्थं संपरायिकं चा ति || सेय्यथा पि महाराज यानि कानिचि जगमानं पाणानं पदजातानि सब्बानि तानि हत्थिपदे समोधानं गच्छन्ति | हत्थिपदं तेसं अग्गमक्खायति यदिदं महन्तत्तेन | एबमेव खो महाराज अप्पमादो एको धम्मो उभो अत्थे समाधिगय्ह तिट्ठति दिट्ठधम्मिकं चेव अत्थं संपरायिकं चा ति ||

असें मी ऐकलें आहे | एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिण्डिकच्या आरामांत राहत होता || तेंव्हां राजा प्रसेनजित् कोसल भगवान् होता तेथें आला | येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस बसला || एका बाजूस बसून राजा प्रसेनजित् कोसल भगवंन्ताला म्हणाला | भदन्त, असा एकादा गुण आहे काय कीं, जो इहलोकींचा आणि परलोकींचा असे दोन्ही अर्थ साधून राहतो || हे महाराज, असा एक गुण आहे जो इहलोकींचा आणि परलोकीचा असे दोन्ही अर्थ व्यापून राहतो || भदन्त, असा एक गुण कोणतां कीं, जो इहलोकींचा आणि परलोकीचा असे दोन्ही अर्थ साधून राहतो || हे महाराज, सावधानपणा हा एक गुण इहलोकींचा आणि परलोकींचा असे दोन्ही अर्थ साधून राहतो || हे महाराज, ज्याप्रमाणें जंगम प्राण्यांच्या पावलांचा समावेश हत्तीच्या पावलांत होतो | हत्तीचें पाऊल सर्व प्राण्यांच्या पावलांत मोठें आहें असें दिसून येतें | त्याप्रमाणें सावधानपणा हा एक गुण इहलोकींचा आणि परलोकींचा असे दोन्ही अर्थ साधून राहतो ||

आयूं आरोगियं वण्णं सग्गं उच्चाकुलीनतं ||
रतियो पत्थयन्तेन उळारा अपरापरा ||
अप्पमादं पसंसन्ति पुञ्ञकिरियासु पण्डिता ||१||


आयुष्य, आरोग्य, वर्ण, स्वर्ग, उच्चकुलीनता, मोठमोठ्य़ा उपभोगाच्या वस्तू यांची इच्छा करणारानें पुण्यकर्मांत सावधानपणें वागावें, अशी ज्ञाते लोक सावधानपणाची प्रशंसा करितात ||१||

अपमत्तो उभो अत्थे अधिगण्हाति पण्डितो ||
दिट्ठेव धम्मे यो अत्थो यो चऽथो संपरायिको ||
अत्थाभिसमया धीरो पण्डितो ति पवुच्चती ति ||२||


सावधानपणानें वागणारा सुज्ञ मनुष्य इहलोकींचा आणि परलोकींचा असे दोन्ही अर्थ साधतो | आणि अशा धैर्यवान् मनुष्याला सर्द्थप्राप्ति झाली म्हणजे त्याला पण्डित असें म्हणतात ||२||

||अप्पमादसुत्तं निट्ठितं||
. . .