बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 45

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 44   भाग २ रा 46

१४६. परिमंडल नेसेन, असा नेम करावा१ ।।१।।
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- परिमंडल म्हणजे जैन किंवा बौद्ध साधु नेसतात त्याप्रमाणें कासोटा वगैरे न घालतां वर्तुलाकार नेसणें. नेम करावा=सिक्खा करणीया.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१४७. परिमंडल पांघरीन, असा नेम करावा ।।२।।
१४८. शरीर नीट आच्छादून गावांत जाईन, असा नेम करावा. ।।३।।
१४९. शरीर नीट आच्छादून गांवांत बसेन, असा नेम करावा ।।४।।
१५०. सुसंवृत गांवांत जाईन, असा नेम करावा ।।५।।
१५१. सुसंवृत गावांत बसेल, असा नेम करावा ।।६।।
१५२. दृष्टि१ खालीं ठेवून गांवांत जाईन, असा नेम करावा ।।७।।
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- विशुद्धिमार्गांत म्हटलें आहे: - अधो खिपेय़्य चक्खूनि युगमत्तदसो सिया । वनमक्कटलोलस्स न चित्तस्स वसं
वजे ।। अर्थ:- दृष्टि खालीं घालावी;  केवळ पायांजवळील दोन हात जमीन पाहावी; वनमर्कटासारख्या चंचल मनाला वश होऊं नये.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१५३. दृष्टीं खालीं ठेवून गांवांत बसेन, असा नेम करावा ।।८।।
१५४. चीवर उडवीत उडवीत गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।९।।
१५५. चीवर उडवीत उडवीत गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।१०।।
१५६. मोठ्यानें हंसत हंसत गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।११।।
१५७. मोठ्यानें हंसत हंसत गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।१२।।
१५८. गांवांत जातांना हळू बोलेन, असा नेम करावा ।।१३।।
१५९. गांवांत बसला असतां हळू बोलेन, असा नेम करावा ।।१४।।
१६०. शरीर हालवीत गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।१५।।
१६१. शरीर हालवीत गांवांत बसणार नाहीं, असा नेम कराव ।।१६।।
१६२. हात हालवीत गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।१७।।
१६३. हात हालवीत गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।१८।।
१६४. डोकें हालवीत गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।१९।।
१६५. डोकें हालवीत गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।२०।।
१६६. कटीवर हात ठेवून गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।२१।।
१६७. कटीवर हात ठेवून गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।२२।।
१६८. डोक्यावरून पांघरून गांवांत जाणार नाहीं, असा नेम कराव ।।२३।।
१६९. डोक्यावरून पांघरून गांवांत बसणार नाहीं, असा नेम करावा ।।२४।।
१७०. टांचा वर करून गांवांत जाणार नाहीं, असा नेम करावा ।।२५।।
१७१. गांवांत पल्लत्थिकेवर१ (१- पल्लत्थिका म्हणजे आरामखुर्चीसारखें बसण्याचें आसन. हें बहुधा वस्त्राचें करीत असत.) बसणार नाहीं, असा नेम करावा ।।२६।।

{वरील सव्वीस नेम भिक्षूच्या सदाचाराला पोषक समजावे.}


१७२. लक्ष्यपूर्वक पिंडपात (भिक्षा) ग्रहण करनि, असा नेम करावा ।।२७।।
१७३. पात्रावर लक्ष्य ठेवून पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा ।।२८।।
१७४. भाताला लागेल एवढेंच वरण घेईन, असा नेम करावा ।।२९।।
१७५. पात्र भरून न जाईल, अशा प्रमाणानें पिंडपात ग्रहण करीन, असा नेम
करावा ।।३०।।
१७६. लक्ष्यपूर्वक भोजन करीन, असा नेम करावा ।।३१।।
१७७. पात्रावर लक्ष्य ठेवून भोजन करीन, असा नेम करावा ।।३२।।
१७८. अनुक्रमें एका बाजूनें जेवीत जाईन, असा नेम करावा ।।३३।।
१७९. भाताला लागेल एवढेंच वरण घेऊन जेवीन, असा नेम करावा ।।३४।।
१८०. मधलाच भात घेऊन जेवणार नाहीं, असा नेम करावा।।३५।।
१८१. ज्यास्ती मिळविण्याच्या इच्छेनें वरण किंवा भाजी भातानें झांकून ठेवणार नाहीं, असा नेम करावा ।।३६।।
१८२. आजारी नसतां वरण किंवा भात आपल्यासाठीं करवून जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।३७।।
१८३. टीका करण्याच्या हेतूनें दुसर्‍याच्या पात्राकडे पहाणार नाहीं, असा नेम करावा ।।३८।।
१८४. मोठा घास करणार नाहीं, असा नेम करावा ।।३९।।
१८५. बेताचा घास करीन, असा नेम करावा ।।४०।।
१८६. घास तोंडाजवळ आणण्यापूर्वी तोंड उघडणार नाहीं, असा नेम करावा।।४१।।
१८७. जेवतानां तळहात तोंडांत घालणार नाहीं, असा नेम करावा ।।४२।।
१८८. तोंडांत घास असतां बोलणार नाहीं, असा नेम करावा ।।४३।।
१८९. हातांतील घांस तोंडांत फेंकून जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४४।।
१९०. घासाचा भाग तोंडानें तोडून जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४५।।
१९१. गालांत अन्न भरून जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४६।।
१९२. हात झाडीत झाडीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४७।।
१९३. भात इकडे तिकडे शिंपडून जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४८।।
१९४. जीभ इकडे तिकडे हारवीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।४९।।
१९५. चपु चपु शब्द करीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।५०।।
१९६. सुरु सुरु शब्द करीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।५१।।
१९७. हांत चाटीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।५२।।
१९८. पात्र चाटीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।।५३।।
१९९. ओंठ चाटीत जेवणार नाहीं, असा नेम करावा ।। ५४।।
२००. उष्ट्या हातानें पाण्याचें भांडे घेणार नाहीं, असा नेम करावा ।।५५।।
२०१. भाताचीं शितें असलेलें पात्र धुवून तें पाणी गांवांत टाकणार नाहीं, असा नेम
करावा ।।५६।।

{वरील तीस नेम भोजनाविषयक आहेत.}
. . .